
सावंतवाडी : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री उदय जामदार व अचानक ग्रुप मित्र मंडळ आणि अचानक महिला मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथे 'सावंतवाडी तालुका मर्यादित' भव्य कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोमवार, दिनांक २६ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालयाजवळ संपन्न होणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी रोख रक्कम आणि चषक अशा स्वरूपात आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक: ₹३,३३३ रोख व ट्रॉफी (श्री. हनुमंत पेडणेकर पुरस्कृत) द्वितीय पारितोषिक: ₹२,२२२ रोख व ट्रॉफी (श्री. बाळू गावडे पुरस्कृत) तृतीय पारितोषिक: ₹१,१११ रोख व ट्रॉफी (श्री. महेश बांदिवडेकर पुरस्कृत) याव्यतिरिक्त, स्पर्धेतील अन्य उत्कृष्ट सादरीकरणासाठी श्री. नामदेव नाटेकर, श्री. बाळा जोशी, श्री. अमर वेंगुर्लेकर, श्री. संजय बागवे आणि श्री. गजानन सातार्डेकर यांच्याकडून उत्तेजनार्थ पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २५० रुपये ठेवण्यात आले असून, जास्तीत जास्त २५ स्पर्धकांनाच या स्पर्धेत सहभाग घेता येईल. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर ही नोंदणी केली जाणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे २३ जानेवारी पर्यंत खालील क्रमांकावर नोंदवावीत:
स्नेहल जामदार: ९४२१७१४२३७
हनुमंत पेडणेकर: ८२७५८५२४३५
बाळू गावडे: ९४२३५१३१५६
सावंतवाडी तालुक्यातील उदयोन्मुख गायकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे उदय जामदार आणि अचानक ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.










