
सावंतवाडी : कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९ टक्के लागला आहे. सावंतवाडी तालुक्यात ८७१ मुले व ८३४ मूली मिळून एकूण १७०५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८५८ मुले तर ८३० मुली मिळून एकूण १६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.