
सावंतवाडी : पणजी पत्रदेवी सात वाजता पणजीहून सुटणारी सामान्य एसटी बस परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे 2×2 एसी दरात आकारली गेली. सावंतवाडी पासून गोवा राज्यात नोकरी निमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अचानक 2×2 जादा दरातील एसटी बस प्रवास करताना अधिक तिकीट आकारल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सावंतवाडी एसटी परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्नीद्वारे विचारणा केली असता त्यांनी उद्धट उत्तरे दिली असल्याचे मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे. नोकरी निमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोजच्या प्रवासात संबंधित एसटी परिवहन महामंडळाच्या गलिच्छ कारभारामुळे नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. याबाबत विचारणा केल्यावर संबंधित अधिकारी मनमानी पद्धतीने उत्तरे देतात. नियमित निमआराम बस सेवा असताना फक्तनी फक्त एसटी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे पणजी ते सावंतवाडी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
याबाबतची दखल संबंधित एसटी परिवहन महामंडळाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने त्वरित घ्यावी व सदर प्रकरणात सावंवाडी आगारातील दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असा इशारा मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी दिला आहे.