
सावंतवाडी : ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत सुधाताई वामनराव कामत जि. प. प्रा. शाळा सावंतवाडी नं. 2 मधील इयत्ता पाचवी गणित संबोध परीक्षेचा निकाल 100% लागला असून यात 13 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत, व दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 20 पैकी 18 विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहे.
त्यांच्या वर्ग शिक्षिका सौ. फाले मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गवस मॅडम ,ठाकूर मॅडम, ढवळ मॅडम ,पाटील यांचे मार्गदर्शन लाभले त्यांचे व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख यांनी आभार मानले. विविध स्पर्धा परीक्षात या प्रशालेचे विद्यार्थी तालुक्यात जिल्ह्यात व राज्यात नेहमीच चमकतात . त्या विद्यार्थ्यांनी प्रशालेचे नाव उज्वल केले आहे.त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे .