मतदानासाठी अमेरीकेतून गाठली सावंतवाडी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2024 06:59 AM
views 912  views

सावंतवाडी : मतदान हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. मतदान हे एक महत्त्वाचे नागरी कर्तव्य आहे. जे आपल्या देशाच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम करते. याच भान राखत सावंतवाडीची कन्या मानसी परांजपे हीन थेट अमेरिकेतून सावंतवाडी गाठली. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. ४ खासकीलवाडा येथे तिन आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत तीन आपलं जबाबदार नागरीक असल्याच कर्तव्य पार पाडलं. येथील माजी प्राचार्य गिरीधर परांजपे यांची ती कन्या असून मतादानासाठी अमेरिकेतून थेट सावंतवाडी गाठल्यान मानसीच सर्वत्र कौतुक होत आहे ‌