'वंदे भारत'ला तळकोकणात थांबा मिळायलाच हवा : शांताराम नाईक

सावंतवाडी टर्मिनस झाल्यास प्रवाशांचे हाल थांबतील : मिहीर मठकर
Edited by: विनायक गांवस
Published on: May 16, 2023 14:48 PM
views 151  views

सावंतवाडी : वसई- सावंतवाडी रेल्वे सुरू व्हावी व सावंतवाडी टर्मिनसच रखडलेल काम पुर्णत्वास न्याव अशी प्रमुख मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आज करण्यात आली. टर्मिनस सुरू झाल्यास कोकणवासीय प्रवाशांची होणारी गैरसोय, त्यांचे होणारे हाल टळणार आहे यासाठी ही आग्रही मागणी करण्यात आली. सध्यस्थितीत सावंतवाडीत मोजक्याच रेल्वेंना थांबा दिला असल्यानं सावंतवाडीकरांची गैरसोय होत आहे. कुडाळ, कणकवलीवर अवलंबून राहावं लागतं असून प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यादृष्टीने टर्मिनस पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे असं मत मिहीर मठकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी टर्मिनस पूर्ण झालं तर 'वंदे भारत' जीची आज ट्रायल घेतली गेली‌. ह्या रेल्वेला देखील तळकोकणात थांबा मिळेल, नाही मिळाला तर तो आम्ही मिळवून घेऊ अस मत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी व्यक्त केल.


सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मिहीर मठकर म्हणाले, आम्ही सावंतवाडीकरच्या माध्यमातून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सह्यांची मोहिम राबविण्यात आली होती. याला उदंड प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना व आम्ही सावंतवाडीकर यांनी एकत्र येत सावंतवाडी टर्मिनस व्हावं व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी मागणी केली आहे. अनेक कारणं देऊन जनशताब्दी सुरू करुन तीन ते चार रेल्वे आमच्याकडून हिसकावून घेत बंद केल्यात. यामुळे सावंतवाडी स्थानकाला रेल्वेला कमी थांबे मिळाले. यामुळे आमच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. १०० रेल्वे गाड्या सावंतवाडीतून जात असाताना केवळ ५ ते ६ गाड्यांना थांबा इथे मिळतं आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यास शहरवासीयांना कुडाळ, कणकवलीत रेल्वेसाठी जाव लागत आहे. यामुळे मोठी गैरसोय कोकणी प्रवाशांची होत आहे. सावंतवाडी टर्मिनस मंजूर होऊन १२ वर्ष झाली तर काम सुरु होऊन ९ वर्ष झाली‌. फेज-वनच काम पूर्ण होऊन फेज-टू चं काम रखडलं गेलय. त्यामुळे सावंतवाडीकरांची गैरसोय होत आहे. यासाठी हे टर्मीनसच काम मार्गी लागाव, महत्वाच्या गाड्यांना सावंतवाडीत थांबा मिळावा यासाठी आमचा लढा आहे. कृती समितीची पुनर्स्थापना करून हा विषय केंद्र सरकारपर्यंत पोहोचवायचा आमचा मानस आहे. यासाठी सावंतवाडीकरांनी एकत्र यावं असं आवाहन मिहीर मठकर यांनी केल आहे. टर्मिनस झाल्यास तळकोकणास पर्यटन दृष्ट्या देखील फायदा कोकणाला होणार आहे असही ते म्हणाले. 


तर कोकण रेल्वे प्रवासी संघटना, मुंबई अध्यक्ष शांताराम नाईक म्हणाले, सावंतवाडी टर्मिनस झाल पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. गेल्या ५ वर्षांत वसई-सावंतवाडी रेल्वेसाठी जवळपास ९२ निवेदन मंत्री, रेल्वे बोर्ड आदींना दिलीत. परंतु, वसई व सावंतवाडी टर्मिनस नसल्यानं ही मागणी प्रलंबित आहे. गेली १२ वर्ष रखडलेल सावंतवाडी टर्मिनसच काम २०२४ पर्यंत पुर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडाव लागेल असा इशारा देत सनदशीर मार्गाने मागणी करत आहोत ती मान्य करा आंदोलनाची वेळ आमच्यावर आणू नका असा इशारा त्यांनी दिला आहे. जर सावंतवाडी टर्मिनस झाल तर प्रत्येक गाडीला सावंतवाडीत थांबा मिळणार आहे. कणकवली, कुडाळनंतर डायरेक्ट गोव्यात जाणाऱ्या गाड्या टर्मिनस नसल्यानं सावंतवाडीत थांबत नाहीत. जर टर्मिनस पूर्ण झालं तर 'वंदे भारत' जीची आज कोकण रेल्वे मार्गावर ट्रायल घेतली गेली‌. ह्या रेल्वेला देखील कोकणात थांबा मिळेल. अन् नाही मिळाला तर तो आम्ही मिळवून घेऊ अस मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबई सेक्रेटरी यशवंत जडयार, सदस्य भरत पंडित, खजिनदार शेखर बागवे, सागर तळवडेकर, सावंतवाडीकर मिहीर मठकर, सिद्धेश सावंत आदी उपस्थित होते.