
सावंतवाडी : सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मनोगतात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रात घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणली. आमचं सरकार हे लोकाभिमुख सरकार आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृतीची जपणूक करण्याच काम हे सरकार करत आहे. सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमास मराठी कलाकारांची उपस्थिती असणार आहे. अनेक दर्जेदार कार्यक्रम तुम्हाला पहायला मिळणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी या सोहळ्यासाठी मेहनत घेतली आहे. सावंतवाडीत आपण हा कार्यक्रम घेतला याबद्दल आपले आभार मानतो.
येत्या १० फेब्रुवारीला ५१ व राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन होत आहे. पुढच्या काळात सावंतवाडी हे पर्यटनदृष्ट्या आकर्षक शहर असेल, दुबईच्या धर्तीवर फाऊंटन मोती तलाव येथे होईल. तर सावंतवाडी टर्मिनसच्या रस्त्यासाठी पालकमंत्री यांनी निधी दिला. सुशोभिकरण त्या ठिकाणी होत आहे. तर ८ कोटी रुपये टर्मिनस व रेस्टॉरंटसाठी रत्नसिंधूतून दिले आहेत. आगामी काळात हे रेल्वे टर्मिनस पुर्ण होईल, कोकणच्या विकासाला गती मिळेल. आमच्या मतदार संघाचा सहा महिन्यांत कायापालट झालेला असेल असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.