सावंतवाडी रेल्वेस्थानकाला नवी झळाळी..!

नारायण राणे, रविंद्र चव्हाणांनी केलं लोकार्पण
Edited by: विनायक गांवस
Published on: August 09, 2024 14:29 PM
views 275  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून करण्यात आले. तसेच खा. नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण

सोहळा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण तसेच  दृकश्राव्य प्रणालीद्वारे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली,  जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी,भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, भाजयुमो राज्य उपाध्यक्ष विशाल परब, भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष, रवींद्र मडगावकर,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक उदय नाईक, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे सरपंच सुहानी गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या छाया नाईक, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपविभागीय अधीक्षक अभियंता वैभव सगरे, सहाय्यक अभियंता प्रमोद लोहार, कोकण रेल्वेचे संचालक हेगडे, प्रधान मुख्य अभियंता नागदत्त राव,स्थापत्य अभियंता कैलास कासार, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे, भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष बाळू देसाई, चद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी स्थापत्य अभियंता कैलास कासार, ठेकेदारांचे प्रतिनिधी रोहित नाडकर्णी, आर्किटेक सोहम सावंत,उपविभागीय अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींना माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.