LIVE UPDATES

सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची बदली

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 03, 2026 10:45 AM
views 33  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची ओरोस मुख्यालय जिल्हा विशेष शाखेत बदली झाली आहे. त्यांच्या जागी कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मकदूम यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार दोन वर्षांपूर्वी अमोल चव्हाण यांनी हाती घेतला होता. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची ओरोस जिल्हा मुख्यालय जिल्हा विशेष शाखेत पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. लवकरच ते या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर त्यांच्या जागी सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदावर कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मकदूम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मकदूम यांच्याकडे मालवण पोलीस ठाण्याचा देखील प्रभारी कार्यभार आहे. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशाने जिल्ह्यातील दोन वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलीस निरीक्षक व अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही झाली आहे. अमोल चव्हाण यांनी सावंतवाडीत आपल्या कार्याची वेगळी छाप सोडली आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका त्यांच्या कार्यकाळात पार पडल्यात.