
सावंतवाडी : ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख उत्तम वाडकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेत नागरिक, पत्रकार आणि वाडकर यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार मित्रांच्यावतीने करण्यात आले आहे.










