
सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना सलग चौथ्यांदा विजयी करण्यात सावंतवाडीने मोठा वाटा उचलला. तालुक्याप्रमाणे शहरवासीयांनी केसरकर यांना साथ दिली. २९१० मतांचं मताधिक्य मिळवून देत केसरकर यांना चौथ्यांदा आमदार केल. यासाठी सावंतवाडीकरांचे शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी आभार मानले आहेत.
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व रिपाई महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. दीपक केसरकर यांनी केलेल्या विकासकामांचे हे फलीत आहे. विरोधकांना मतपेटीतून मिळालेल हे उत्तर आहे. शहरातून दीपक केसरकर यांना ६२१७ एवढी मत मिळाली. तर २९१० मतांचं मताधिक्य त्यांना मिळाल. यासाठी सावंतवाडीकरांचे व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे शिवसेना शहरप्रमुख, माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी आभार मानले आहेत.