'माझी माती, माझा देश' ; सावंतवाडी न.प.त मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी - कर्मचाऱ्यांची पंचप्रण शपथ

Edited by: विनायक गावस
Published on: August 11, 2023 12:37 PM
views 155  views

सावंतवाडी : 'मेरी माटी मेरा देश' म्हणजेच माझी माती माझा देश ह्या अभियाना अंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेत मुख्यअधिकारी सागर साळुंखे व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी पंचप्रण शपथ घेतली. 

 ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत सावंतवाडी शहरात आपल्या मातीविषयी जनजागृती प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी तसेच मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा याकरिता सावंतवाडी शहरात ११ व १२ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचतगट, सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर व मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे. शनिवार दि. १२ रोजी कै. सुधाताई वामनराव कामत जि.प.प्राथमिक शाळा नं. २ सावंतवाडी या प्रशालेत हे कार्यक्रम  होणार आहेत. ११ रोजी सकाळी १० वा. वसुधा वंदन, अमृत वाटिका हा कार्यक्रम माठेवाडा मदारी रोड येथे होणार आहे. 

दि. १२ रोजी सकाळी ७.२० वा. कै. सुधाताई वामनराव कामत जि. प. प्राथमिक शाळा नं. २, सावंतवाडी येथे ध्वजारोहण, ७.३० वा. शिलाफलक, ७.४५ वा. पंचप्रण शपथ घेणे, ८ वा. स्वातंत्र्यसैनिक व वीरांना वंदन असे कार्यक्रम होणार आहेत. 

सावंतवाडी शहरात दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त मागच्या वर्षीप्रमाणे सर्व देशात "हर घर तिरंगा" हा उपक्रम राबवायचा असून मागील वर्षी सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात आलेले राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याची खात्री करून नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवावा, असे आव्हान करण्यात येत आहे. ज्या नागरिकांकडे राष्ट्रध्वज उपलब्ध नाहीत त्यांनी नगरपरिषद कार्यालयाचे बचतगट कार्यालय CLF केंद्र वैश्यवाडा येथे राष्ट्रध्वज विक्रीस ठेवले आहेत. तिथून राष्ट्रध्वज विकत घ्यावयाचे आहेत.

या कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचतगट, सर्व नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर व मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.