सावंतवाडी न. प. च्यावतीने जीर्ण धोकायदायक झाड हटविण्यास सुरुवात !

देव्या सूर्याजी यांनी मानले आभार
Edited by: विनायक गावस
Published on: October 05, 2023 13:55 PM
views 348  views

सावंतवाडी : शहरातील जीर्ण व धोकादायक झाडांमुळे घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर नगरपरिषद प्रशासनानं सर्वेक्षण करत जीर्ण व धोकादायक झाड हटविण्याच काम सुरु केले आहे. जिल्हा परिषद शाळा नं. २ च्या समोरील आंब्याच्या झाड धोकादायक स्थितीत होत. नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष देत वेळीच योग्य ती उपाययोजना करावी. शाळेच्या प्रवेशद्वारा समोर हे झाड असून वेळीच दक्षता न घातल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. याठिकाणी विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

तसेच गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेजारी असलेले वटवृक्ष नेमळेकर यांच्या घरावर कोसळून मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले होते. त्यामुळे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांनी केली होती.

त्याप्रमाणे उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांनी सर्वेक्षण करत ते धोकादायक झाड हटवलं आहे. याबद्दल न.प.चे मुख्याधिकारी सागर साळुंखे व गजानन परब यांचे देव्या सूर्याजी यांनी आभार मानले आहेत.