सावंतवाडी न. पा. ने 500 भटक्या कुत्र्यांची नसबंदी करावी : राजू मसुरकर

Edited by: विनायक गावस
Published on: September 15, 2023 19:11 PM
views 50  views

सावंतवाडी : गेल्यावर्षी सावंतवाडी नगरपालिकेने 500 भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली होती. अजून दोन हजार ते अडीच हजार पर्यंत भटके कुत्रे शहरामध्ये आहेत. त्यामुळे नागरिकांना व वृद्ध,शालेय मुलांना जीव मुठीत धरून दैनंदिन कामासाठी घराच्या बाहेर पडावे लागते. यासाठी नगरपालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करावी अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली आहे.


दरम्यान सावंतवाडी शहरांमध्ये धूमस्टाईल युवक भरधाव वेगाने श्रीराम वाचन मंदिर ते पंचम खेमराज कॉलेज पर्यंत वेगाने ये-जा करत असतात त्यामध्ये अनेक नागरिकांना या वाहनामुळे गंभीर अपघात होऊ शकतो. शालेय मूले वृद्ध नागरिक रुग्णालयामधून येणाऱ्या गरोदर स्त्रीया फुटपाटवरुन समोरील दुकानांमध्ये जात असताना भरधाव वेगाने वाहन चालकांनी गाडी चालवल्यामुळे असे अपघात नेहमीच घडत असतात त्यामध्ये जीव जाण्याचा धोका किंवा कायमस्वरूपी अपंगत्व नागरिकांना येऊ शकतो. याची गंभीर दखल घेऊन मुंबई नगर विकास मंत्रालयाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी तसेच न केल्यास नागरिकांची जीवनाची रक्षा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्यावतीने दाखल करावी लागेल असा इशारा देखील राजू मसुरकर यांनी यावेळी दिला आहे.