
सावंतवाडी : बरीच वर्षे बंद अवस्थेत असणारे सावंतवाडी नगरपरिषदेचे घड्याळ अखेर सुरू झाले आहे. यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागल्याची माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली. तर पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीचा पर्यटनदृष्ट्या नावलौकिक राज्यभरात व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
गेली अनेक वर्षे हे घड्याळ बंद अवस्थेत होते. तांत्रिक अडचणींमुळे ते दुरुस्त होत नव्हते. त्यामुळे डिजीटल घड्याळ बसविण्याचा विचार देखील चालला होता. मात्र, अथक प्रयत्नांमुळे हे घड्याळ पुन्हा एकदा सुरू झाले आहे. यासाठी नगरपरिषदेकडून विशेष मेहनत घेण्यात आली असून आजपासून पुन्हा एकदा घड्याळाचे काटे फिरताना दिसणार आहेत.
विशेष म्हणजे सावंतवाडीच्या चहू बाजूंनी हे घड्याळ दिसते. तर दररोज पहाटे ६, दुपारी १२ अन् रात्री ९ वाजता भोंगा देखील होतो. हे घड्याळ पुन्हा सुरू झाल्याने सावंतवाडीकरांकडून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागल्याचे सांगितले.
दरम्यान, नगरपरिषदेच घड्याळ दुरुस्त झालं असून आजपासून ते सुरू झालं आहे. पर्यटनासाठी महत्वाच असं ते ठिकाण असून बंद अवस्थेतील हे घड्याळ बऱ्याच वर्षांनी सुरू करून घेतलं आहे. तर नमो उद्यानचही काम युद्धपातळीवर सुरू असून ते काही दिवसात सुरू होणार आहे. मोती तलावात बोटींग सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
सत्तेत आल्यानंतर सावंतवाडी विकसित करण्यासाठी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर सर्व नगरसेवक प्रयत्न करत असून सावंतवाडीच नाव पर्यटनदृष्ट्या महाराष्ट्र होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सभापती मोहिनी मडगावकर यांनी दिली. यावेळी नगरसेविका सुकन्या टोपले,तुषार सरडे , गजानन परब, मनोज राऊळ आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते










