
सावंतवाडी : शहराच वैभव असलेल्या मोती तलावाच्या कोसळलेल्या काठाच काम सध्या सुरू आहे. परंतु, हे काम करत असताना जबाबदार सरकारी अधिकारी, सुपरवायझर घटनास्थळी उपस्थित नाहीत. हे काम तकलादू पद्धतीने सुरू असून काठ भविष्यात पुन्हा कोसळण्याची शक्यता आहे अशी नाराजी भाजपाचे माजी शहराध्यक्ष अँड. संजू शिरोडकर यांनी व्यक्त केली आहे.
आज सकाळी नागरिकांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी माहिती घेतली असता ते काम चुकीच्या पध्दतीने केले जात असल्याच लक्षात आल्याच मत त्यांनी व्यक्त केल. जबाबदार सरकारी अधिकारी, कर्मऱ्यांच्या अनुपस्थितीत काम झाल्यास ते काम निकृष्ठ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषद प्रशासनानं दखल घेत योग्य पद्धतीनं काम करावं अशी मागणी त्यांनी केली आहे.