
सावंतवाडी : कारिवडे गावात सावंतवाडी कालिकामंदीर जाणारी बस वेळेवर येत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. तसेच कारिवडे गावातील ग्रामस्थ हे भाजी विक्रीसाठी सावंतवाडी शहरात जातात परंतु सद्यस्थितीत कालिका मंदिर बस वेळेवर येत नसल्यामुळे याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी आगार प्रमुखांना धारेवर धरल.
यावेळी मंगळवारी सकाळी ६.२० ची बस आलेलीच नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावंतवाडी ते कालिका मंदिर (कारिवडे) एस.टी.बस वेळेवर सोडावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर सर्व विद्यार्थ्यांसमवेत तसेच ग्रामस्थांसह उपोषणासारखा मार्ग पत्करावा लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा कारिवडे ग्रामस्थांनी दिला आहे.