
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी पत्रकार संघाचा 19 वा पत्रकार पुरस्कार वितरण आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा उद्या रविवार ७ जुलै रोजी सकाळी १० :३० वाजता सावंतवाडी येथील आर पी डी काॅलेजच्या नवरंग सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे यंदाचे पुरस्कार विजेते वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार सागर चव्हाण तर माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण मांजरेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. स्व. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाज सेवक पुरस्कार निलेश परब यांना तर स्व. बाप्पा धारणकर स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार दिव्या वायंगणकर यांना जाहीर झाला आहे. डॉ अजय स्वार यांचे वडील स्व.पांडुरंग स्वार स्मृती प्रित्यर्थ जीवनगौरव पुरस्कार राजू तावडे यांना आणि कै.बंडोपंत भिसे उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार मालवण येथील छायाचित्रकार समीर म्हाडगुत यांना या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार विनायक राऊत, व्हॅरेनियम क्लाऊड लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन साबळे, माजी आमदार राजन तेली, युवा उद्योजक विशाल परब, सिंधू रत्न फाउंडेशन, मुंबई शैलेश परब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अर्चना घारे, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाचे अध्यक्ष विकास सावंत, पत्रकार अधिसूचिधारक समिती कोल्हापूर संचालक गजानन नाईक, सद्गुरु डेव्हलपर्स उदय भोसले, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत भोसले, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अॅड संतोष सावंत, पत्रकार पुरस्कार निवड समिती प्रमुख अॅड परिमल नाईक, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर हे उपस्थित असणार आहेत.
या समारंभास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे.