सावंतवाडीत आज होणार 'जागर मराठीचा' !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 27, 2024 07:41 AM
views 141  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान वसई याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त आज मंगळवारी  "जागर मराठीचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने शाळकरी मुलांच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये मराठीचे प्राध्यापक तथा कोंड्याळकार प्रा.तूषार भाग्यवंत, कळसुलकरच्या शिक्षिका सौ नूतन पावसकर,प्रा.रूपेश पाटील तसेच पत्रकार प्रवीण मांजरेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर तर अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे हे उपस्थित राहणार आहेत.

तरी सर्व मराठी प्रेमी आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य यांनी आज सायंकाळी 4:30 वाजता सावंतवाडी नगरपरिषद पत्रकार संघ नजिक हॉल येथे उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सचिव मयूर चराठकर खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे.