सावंतवाडीतील व्यापारी अशोक गुप्ता यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 18, 2024 09:44 AM
views 555  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील प्रतिथयश व्यापारी अशोक गुप्ता यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही महिने त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी त्यांना सावंतवाडीत आणण्यात आले होते. सावंतवाडीतील जानकीबाई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

सावंतवाडीतील एक जेष्ठ होलसेल व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध होते. सामाजिक क्षेत्रात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. सावंतवाडीतील प्रसिद्ध चितारआळी गणेशोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष होते. तसेच भटवाडी येथील नवरात्रोत्सव मंडळाचे देखील ते सल्लागार होते. सावंतवाडीतील नॅब संस्थेचे देखील ते संचालक होते. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा चेतन, सून, तीन विवाहित मूली, जावई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.