सावंतवाडी भंडारी मंडळाचा वधू - वर मेळावा आज !

Edited by: ब्युरो
Published on: January 07, 2024 10:58 AM
views 203  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचा वधू - वर मेळावा 7 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. RPD हायस्कुलचा 'नवरंग' कलामंच हॉल इथं सकाळी 10ते 4 यावेळेत मेळावा होणार आहे.

मेळाव्यात एकाच छताखाली वधू वरांना प्रत्यक्ष पाहण्याची - परिचय करून घेण्याची संधी भंडारी समाज मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी मेहनत घेत असून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी सावंतवाडी तालुका भंडारी भवन कार्यालय 8275116117 यावर संपर्क साधण्याच आवाहन प्रभारी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी केलंय. इच्छुक वधू वरांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय.