सावंतवाडी बार असोसिएशनतर्फे न्यायालयात योगदिन साजरा

Edited by: विनायक गावस
Published on: June 22, 2023 18:31 PM
views 78  views

सावंतवाडी : 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्राथमिक ,माध्यमिक शाळांमध्ये तसेच सर्व महाविद्यालयांमध्ये तसेच न्यायालय संस्था, नगरपालिका आदी सर्व ठिकाणी सकाळी योगा व प्राणायामने दिवसाची सुरुवात करण्यात आली.

सावंतवाडी तालुका बार असोसिएशन तर्फे सावंतवाडी न्यायालयात सर्व वकील व कर्मचाऱ्यांनी योगा दिन साजरा केला. सर्वत्र आज योगाचा प्रसारआणि प्रचार करण्यात येत होता.