
सावंतवाडी : चिन्ह किती महत्त्वाचे असतं ते मागच्या अडीच वर्षांत राज्यातील जनतेन पाहिल. विधानसभा निवडणुकीत उभे असणाऱ्या अपक्ष उमेदवारांना चिन्हांच वाटप केलं. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक वसंत केसरकर - शिवसेना ( धनुष्यबाण ) माजी आमदार राजन कृष्णा तेली - उबाठा शिवसेना (मशाल), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अपक्ष अर्चना संदिप घारे-परब -( लिफाफा) तर दत्ताराम विष्णू गावकर (अपक्ष : शिवण यंत्र) भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष, अपक्ष उमेदवार विशाल प्रभाकर परब -(गॅस शेगडी) यशवंत पेडणेकर (अपक्ष बॅट्समन) हे उमेदवार रिंगणात आहेत.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोन लाख ३० हजार २ मतदार आहेत. यामध्ये पुरुषांपेक्षा ७०६ महिला मतदार जास्त आहेत. यामध्ये पुरुष १ लाख १४ हजार ६४८ तर महिला १ लाख १५ हजार ३५४ मतदार आहेत. वेंगुर्ले तालुक्यात पुरुष ३३ हजार ७१८ तर महिला मतदार ३४ हजार २६७ मिळून ६७ हजार ९८५ मतदार, सावंतवाडी तालुक्यात पुरुष ६० हजार ४६५ तर महिला ६० हजार ७९८ मिळून १ लाख २१ हजार २६३ मतदार, दोडामार्ग तालुक्यात पुरुष मतदार २० हजार ४६५ तर महिला मतदार २० हजार २८९ मिळून ४० हजार ७५४ मतदार आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात महिला मतदार निर्णायक ठरणार आहेत.