
बांदा : बांदा येथे बांदेश्वर मंदिराजवळ बांदा विविध कार्यकारी संस्थेच्या सभागृहात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शेतकरी संघटनेची बैठक झाली. विधानसभा निवडणूकमध्ये शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करण्याविषयी एकत्रित चर्चा, विचार विनिमय आणि त्या अनुषंगाने अंतिम निर्णय घेण्यासाठी सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अति महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एकमताने उमेदवार देण्याच्या विचारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच योग्य उमेदवाराची निवड, निवडणूक प्रक्रिया, व्यूहरचना करण्यासाठी उपस्थितांमधून कोअर कमिटी निर्गठीत करण्यात आली. कमिटी शेतकरी संघटनेचा संभाव्य उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा २७ ऑक्टोबर २०२४ रोजी करून २८ ऑक्टोबर २०२४ रोजी शेतकरी संघटनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल असे जाहीर करण्यात आली.
बैठकीची प्रस्थावना सुरेश गावडे यांनी, प्रस्थावित अध्यक्षीय मनोगत विलास सावंत, हेतू मार्गदर्शनपर आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेंगुर्ला नगरपरिषदचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर तर आभार प्रदर्शन संजय देसाई यांनी केले.
सदर बैठकीस सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत, सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे संचालक दिवाकर म्हावंळणकर, सामाजिक कार्यकर्ते आणि रोनापाल माजी सरपंच सुरेश गावडे, उद्योजक आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण परब, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघ अध्यक्ष संजय देसाई, सचिव अशोक सावंत, खजिनदार आकाश नारसुले, प्रगत शेतकरी प्रणव नाडकर्णी, प्रगत उद्योजक नारायण गावडे आणि चंद्रशेखर देसाई, जयप्रकाश चमणकर, शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटना अध्यक्ष राजेंद्र अंदुर्लकर, सचिव हनुमंत गवंडी , सदस्य भानुदास गवंडी, शेखर नाईक, शरद आरोसकर,वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, रत्नदीप धुरी, प्रगत आंबा काजु बागायतदार संघटना आणि संशोधक विलास ठाकूर, यशस्वी सरपंच प्रकाश गाडेकर, जिल्हा नर्सरी संघटना शिवराम आरोलकर, कामगार ठेकेदार समीर सावंत, प्रगत उद्योजक सुहास सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर परब, लाकूड व्यापारी संघटना सदस्य शिवाजी गवस आदी हजर होते.