सावंतवाडीतील 'ते' महान नेते जे ६ महिने जेलमध्ये राहिले

तेलींच्या स्टेट्सवर केसरकर समर्थकांचे पोस्टर
Edited by: विनायक गांवस
Published on: October 10, 2024 09:40 AM
views 509  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्टेट्स वॉर सुरु झाला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी ठेवलेल्या स्टेटस नंतर केसरकर समर्थक शिवसैनिकांकडून देखील पोस्टर व्हायरल केलं जातं आहे. 

यामध्ये ''ओळखा पाहू, सावंतवाडीतील 'ते' महान नेते जे ६ महिने जेलमध्ये राहिले'' असा आशय लिहीला आहे. आता हे पोस्टर नेमकं कोणासाठी आहे ? हा आशय नेमका कोणासाठी आहे ? अन् केसरकर समर्थक शिवसैनिक तो का शेअर करत आहेत ? याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे 'बॅनर बाबां'ची बॅनरबाजी सुरू असताना दुसरीकडे 'स्टेटस बॉय' निर्माण होताना दिसत आहेत.