
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांनी केवळ विकासाच्या वल्गना केल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केसरकर पुन्हा तेच करत आहेत. मात्र, सुज्ञ जनता आता दीपक केसरकर यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. येत्या निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदार संघात परिवर्तन अटळ आहे असा विश्वास उबाठा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी व्यक्त केला.
गेल्या पंधरा वर्षात मंत्री दीपक केसरकर यांनी अनेक राजकीय नेत्यांचा फायदा घेऊन आपल्या स्वार्थासाठी जे राजकारण केलं ते सर्व राजकीय नेते या विधानसभा निवडणूकीत दीपक केसरकर यांना अवघड ठरणार आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.