310 मतदान केंद्रावर कर्मचारी येण्यास सुरुवात

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ
Edited by: विनायक गांवस
Published on: November 19, 2024 14:37 PM
views 242  views

सावंतवाडी : राज्यातील विधानसभा  निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. आज पासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत तयारी सुरू केली असून 270 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदार संघातील एकूण 310 मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचाऱ्यांना पाठवण्यास सुरुवात झाली. या  मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत  हेमंत निकम आणि  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी नियोजन केले असून निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन व इतर सामुग्री कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते. 


सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना पोलिसां सोबत त्यांना  नेमून देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले.  38 एसटी गाड्या व तीन मिनी बसेसद्वारे या मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यातील 390 मतदान केंद्रावर हे कर्मचारी रवाना झाले. सावंतवाडी जिमखाना मैदान येथे सकाळपासूनच निवडणुकीसाठी लागणारी सामुग्री, व्हि ईएम मशीन निवडणूक कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.  दरम्यान उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल  जिल्ह्यातील निवडणूक केंद्रांना  भेट देत आहेत.  पोलीस महानिरीक्षक संजय दरोडे व पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सावंतवाडी जिमखानामैदान येथे सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे  इव्हीएम मशीन इतर साहित्य ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.

  सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकूण 310 मतदान केंद्र असून १५०० कर्मचारी निवडणुकी निवडणूक प्रक्रियेसाठी घेण्यात आले आहेत. तर पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्ड मिळून एकूण ६०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी एसटीच्या 38 गाड्या व तीन मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदारसंघातून एकूण दोन लाख, तीस हजार,  मतदार असल्याची माहिती श्री. निकम यांनी दिली.