खासदारासह सावंतवाडीचा 'आमदार'इंडिया आघाडीचा असेल : विनायक राऊत

Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2024 07:18 AM
views 53  views

सावंतवाडी : इंडिया आघाडीचा खासदार रत्नागिरी-सिंधुदुर्गतून निवडून जाईलच. त्याचबरोबर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पुढचा 'आमदार' हा देखील इंडिया आघाडीचाच असेल असा दावा इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी केला. तर नारायण राणे-दीपक केसरकर यांच्यावर टीकेचा बाण सोडला. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आयोजित सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, दीपक केसरकर यांची पावलं आम्ही त्याचवेळी ओळखली होती. कधीना कधी केसरकर जाणार हे ठावूक होत असा हल्लाबोल दीपक केसरकर यांच्यावर केला. तर आम्ही सगळ्यांनी अभ्यास करून पदवी मिळवली आहे. नारायण राणे यांनी अभ्यास न करता मिळवलेली पदवी आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या कुळाचा जेवढा उद्धार केला तेवढा कुठल्याही विरोधकान केलेला नाही. परंतु, आज तेच राणे- केसरकर एकत्र आलेत. विरोधकांनी डुप्लिकेट विनायक राऊत माझ्या विरोधात उभा केला आहे‌. माझ्या सामाजिक कामाशी, कार्याशी बरोबरी करता येत नसल्याने रडीचा डाव विरोधक खेळत आहेत. पण, जनताच तुम्हाला दाखवून देईल मशालीला मतदान करत विनायक भाऊ राऊतलाच विजयी करेल व पुन्हा खासदार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, संजय पडते, इर्शाद शेख, अँड. दिलीप नार्वेकर, शैलेश परब, शब्बीर मणियार, अण्णा केसरकर, विभावरी सुकी, जान्हवी सावंत, समीर वंजारी, रेवती राणे, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, मायकल डिसोझा, बाळा गावडे, चंद्रकांत कासार महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.