सोनुर्ली जत्रोत्सवातून सावंतवाडी आगाराला मोठ उत्पन्न

Edited by:
Published on: November 22, 2024 14:10 PM
views 429  views

सावंतवाडी : दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवातून सावंतवाडी आगाराला एक लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले. जत्रोत्सवाला  हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. दरवर्षीप्रमाणे सावंतवाडी आगाराने भक्तांच्या सोईसाठी जादा गाड्या सोडल्या होत्या. आगाराने चोख नियोजन केले होते. आगारातून सोडण्यात आलेल्या आठ जादा गाड्यांमार्फत एकूण १३४फेऱ्यांतून आगाराला एक लाख १० हजार १८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी सावंतवाडी आगाराचे व्यवस्थापक नीलेश गावित, स्थानकप्रमुख राजाराम राऊळ, कार्यशाळा अधिकारी मोहिते तसेच सर्व वाहक, चालक, वाहतूक नियंत्रकांचे सहकार्य लाभले.