
सावंतवाडी : वैश्यवाडा सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदिराच्या कलशारोहणाचा १२ वा वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सकाळी गणपती पूजन, पुण्याहवाचन व इतर पूजाविधी, त्यानंतर श्री हनुमान सहपरिवार देवतांची महापुजा व हवन, पूर्णाहुती, महाआरती व सामुहिक गाऱ्हाणे, महाप्रसाद व रात्री भजनादी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सुनील बांदेकर व रोहित सराफ हे यजमान होते. हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.










