वेंगुर्ले मार्गावर एसटी आणि दुचाकीचा अपघात

तरुणी जखमी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 26, 2026 19:11 PM
views 19  views

कुडाळ : कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथे आज दुपारी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक तरुणी जखमी झाली आहे. सुदैवाने, या अपघातात तरुणीला किरकोळ दुखापत झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळ आगारातून दुपारी ३:०० वाजता कुडाळ-मठ-वेंगुर्ला ही बस (क्र. MH 14 BT 4932) मार्गस्थ झाली होती. दुपारी ३:३० च्या सुमारास ही बस वाडीवरवडे येथे आली असता, पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीने बसला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील तरुणीच्या पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमी तरुणीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी, या मार्गावरील वाढत्या रहदारीमुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.