सावंतवाडीचा कारभार भ्रष्टाचार मुक्त असेल : ॲड. अनिल निरवडेकर

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 24, 2026 15:02 PM
views 90  views

सावंतवाडी : पाणी पुरवठा योजनेसोबत भुयारी गटार ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाळणेकोंड धरणातील गाळ काढण्यासाठी लवकरच पाठपुरावा करणार असून भटक्या कुत्र्यांबाबत त्वरित धोरण स्वीकारले जाईल. नगरपरिषदेचा कारभार हा भ्रष्टाचार मुक्त असेल अशी ग्वाही सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिली. 

सावंतवाडी नगरपरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा लोकमान्य टिळक सभागृहात पार पडली. खेळीमेळीच्या वातावरणात प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.‌ यावेळी श्री. निरवडेकर यांनी नगरसेवकांच्या सुचना ऐकून घेत मागण्यांवरही सकारात्मक प्रतिसाद दिला. मच्छी मार्केट पाणी पुरवठा, शहरात होणाऱ्या कचऱ्यासह विविध प्रश्नांवर त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. भटक्या कुत्र्यांचा होणारा उपद्रव व काल झालेल्या जखमी मुलांची भेट घेतल्यानंतर तात्काळ यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे श्री. निरवडेकर यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, माजी नगराध्यक्ष नगरसेवक संजू परब, सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड निता सावंत-कविटकर, ॲड सायली दुभाषी, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, तौकिर शेख, देवा टेमकर, निलम नाईक, वीणा जाधव, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, शर्वरी धारगळकर, सुकन्या टोपले, स्नेहा नाईक, सुनिता पेडणेकर आदींसह नगरसेवक नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.