...तर त्यांची जीभ का छाटू नये ?

हिंदू जागा झाला तर खड्ड्यात गाढेल : नितीन महाजन
Edited by:
Published on: February 20, 2026 10:48 AM
views 55  views

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमातेची कत्तल करणाऱ्यांचे हात छाटले. हिंदूच जबरदस्ती धर्मांतरण करणाऱ्यांचा शिरच्छेद केला. आजही काही नालायक या भुमित राहून भारत मातेला माता मानायला, तीच गुणगान गायला, वंदे मातरम म्हणायला जीभ जड होत आहे. त्यामुळे अशांची जीभ आम्ही का कापू नये ? असा सवाल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक महाजन नितीन महाजन यांनी केला. सावंतवाडी गांधी चौक येथे आयोजित विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. 

महाजन म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या माध्यमातून राजमाता जिजाऊंच स्वप्न पूर्ण केले. मात्र, आज हिंदूच्या मुली बाटवल्या जातात, लॅण्ड जिहादच्या नावाखाली जमिनी बळकावली जातेय. गोमातेची हत्या कसायांच्या माध्यमातून केली जातेय. या गोमातेला कापणाऱ्यांचे हात छाटणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आज भारतातील 13 लाख महिला गायब आहेत. यात 4 लाख तरूणी 18 वर्षांखालील आहेत. 9 लाख महिला विवाहित आहेत. पाश्चात्य संस्कृतीच्या नावान आमच्या संस्कृतीबाबत हिंदू धर्म कसा वाईट हे दाखवले जातय असं मत त्यांनी व्यक्त केल. 

दरम्यान, 40 दिवस मृत्यू यातना सहन करून देखील संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही. मात्र, आज काही धर्मांतरण किराणासाठी होतात. आपल्या संस्कृतीला, धर्माला  पोखरण्याच काम होतय. परंतु, बजरंग दलाने त्यांचा बंदोबस्त करण्याच ठरवल आहे. औरंगजेबाची कबर देखील एकदिवस इथून  काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या टीपू सुलतानने दीड लाख हिंदूची कत्तल केली. आज हा काहींना तो स्वातंत्र्य सैनिक वाटतो असाही टोला हाणला. तर सावंतवाडीत काहींची रस्ता आडवायची हिंमत होतेय. मात्र, हिंदू जागा झाला तर त्याच खडड्यात गाढल्याशिवाय राहणार नाही. रस्त्यात स्पीड ब्रेकर करून चादर टाकू असा इशारा त्यांनी दिला. बजरंग दल विनाकारण कुणाला त्रास देणार नाही. मात्र, छेडण्याचा प्रयत्न केला तर बजरंग दलाची दुसरी बाजू देखील दाखवावी लागेल अस विधान त्यांनी केले. संविधानाच्या त्रिसुत्रीवर आम्ही चालतो. परंतु, आमचे हात बांधलेले नाहीत. आमचा एक बजरंगी 100 जणांना भारी आहे. त्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज व हनुमंत राय आहे असे सांगितले. 

तसेच गो मातेची कत्तल होणार नाही. आमच्या आया बहिणी पळवल्या जाणार नाही याची दक्षता प्रत्येकान घ्यावी. सावंतवाडीत असा प्रकार झाला तर त्यांचे हात पाय मोडून टाका, चौरंग करा असा इशारा दिला. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे, धर्मवीर संभाजी महाराजांचे वंशज आहोत. आमच्या माता-भगिनी रस्त्यावर पडलेल्या नाही. आम्हाला 15 मिनिटे नको 5 मिनीटे पुरेशी आहेत.  हिंदू मुलिंना बाटवण्यासाठी जातीनुसार रेट ठरवले जात असताना आम्ही काय करतोय ? त्यामुळे दक्षता बाळगा अस आवाहन त्यांनी केले. समाज म्हणून माझी संस्कृती जपली गेली पहिजे. जातीपातीत विभागलेल्या हिंदूना एकत्र करण्याच काम आपल आहे. आपले चांगले दिवस सुरू आहेत. देशात अन् राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यांनी अनधिकृत कत्तल खाने बंद करण्यासाठी, गो रक्षकांच्या मागे भिंती सारख उभ राहील पाहिजे असही मत श्री. महाजन यांनी  व्यक्त केले. या कार्यक्रमास पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. तसेच  

सह संयोजक संदेश भेगडे, जिल्हा संयोजक बजरंगदल कृष्णा धुळपणावर, तालुका संयोजक साईराज नार्वेकर , जिल्हा सहमंत्री चिन्मय रानडे, प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर आदींसह विहींप, बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते ‌