
कुडाळ : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आपल्यासारखे मावळे सातत्याने विविध उपक्रमातून प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथील भारतीय मराठा समाज महासंघ, माठेवाडा येथील स्वराज्य मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील दत्तराज मित्र मंडळाने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आमदार निलेश राणे यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी जिल्हा सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, रुपेश कानडे, पंचायत समिती सदस्य करुणा पावसकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, महासंघाचे धीरज परब स्वराज मित्र मंडळाचे शिवम म्हाडेश्वर, दत्तराज मित्र मंडळाचे बल्लाळ, आबा धडाम, राकेश कांदे, चेतन पडते, साक्षी सावंत, रेखा काणेकर, रेवती राणे उपस्थित होते.










