छत्रपतींमुळे आपण हिंदू म्हणून श्वास घेतोय !

पालकमंत्री नितेश राणेंचं विधान
Edited by: विनायक गांवस
Published on: February 19, 2026 20:15 PM
views 43  views

महाराष्ट्राच्या 'शाहिरी बाणा' कार्यक्रमाचे उद्घाटन

 सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ओळख दिली. हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेलं योगदान मोठ आहे. हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याच सगळं श्रेय छत्रपती शिवरायांना जात अस मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केल. तसेच युद्धनीती, प्रशासनाचा कारभार, रयतेला न्याय देण्याच्या बाबतीत महाराजांनी आमच्या समोर आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्राला शिवरायांमुळे वेगळी ओळख मिळाली. छत्रपतींच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊन कार्यरत असल पाहिजे असं आवाहन त्यांनी केले. सावंतवाडी येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित महाराष्ट्राचा 'शाहिरी बाणा' कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आपण राजांचा इतिहास वाचला आहे. इस्लामिक आक्रमक होताना, आपल्या माता भगिनींची अब्रू लुटली जाताना छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचे राज्य म्हणून त्याला ओळख निर्माण करून दिली.  महाराष्ट्र राज्य हे छत्रपतींच्या विचारांवर चालणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा विचार जपला जात आहे. आपणही स्वराज्याचे मावळे म्हणून छत्रपतींचा हा विचार जपला पाहिजे अस आवाहन केलं. तर जिल्हा प्रशासनाने शाहीरी बाणाच्या माध्यमातून आयोजित केलेला कार्यक्रम कौतुक केले. सांस्कृतिक क्षेत्रात असणार प्रशासनाचं काम उल्लेखनीय असल्याचे उद्गार पालकमंत्री नितेश राणेंनी काढले.

यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आजही महाराष्ट्रात चालत आहे. शेतकऱ्यांबाबत धोरण, पर्यावरण, महिलांचा आदर करणारे जाणते राजे शिवाजी महाराज होते. स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान शिवराय राहीले आहेत असं विधान त्यांनी केल. यानंतर लेखक, दिग्दर्शक राष्ट्रभुषण शाहिर रूपचंद चव्हाण यांचा महाराष्ट्राचा 'शाहिरी बाणा' कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, युवराज लखमराजे भोंसले, अप्पर जिल्हाधिकार शुभांगी साठे, भुसंपादन अधिकारी आरती देसाई, बालाजी शेवाळे, प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, दिग्दर्शक दीपक कदम आदींसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रांताधिकारी समीर घारे यांनी केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी तर आभार तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मानले.