कणकवलीत आज योजनांची माहिती देण्यासाठी कॅम्प

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 20, 2026 10:51 AM
views 49  views

कणकवली : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे मागास प्रवर्गातील मंडळींसाठी विविध योजना राबवित आहे. कणकवली शहरातील मागास प्रवर्गातील मंडळींना या योजनांची माहिती देण्यासाठी आज शुक्रवार २०  फेब्रुवारीला सकाळी १० वा. सिद्धार्थनगर येथे कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पचे उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या कॅम्प मागास वर्गातील मंडळींनी उपस्थित रहावे, असे आवाहन गरसेवक लुकेश कांबळे, समतादूत अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी केले आहे.