
सावंतवाडी : येथिल जागृत अशा स्वयंभू श्री देव पाटेकर व श्री देव आत्मेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. अभिषेकासह दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी होती. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. भजन, आरती आदी कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व नेत्र दीपक रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.










