
दोडामार्ग : पाटये पुनर्वसन या शाळेत गड किल्ला स्वच्छता, गड संवर्धन व रक्षण यासाठी दरवर्षी अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून दुर्ग प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक यांच्यामार्फत या शाळेत ऐतिहासिक शस्त्रे व इतिहासाची लिखित साधने यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ज्ञानेश्वर राणे व बाबा चीपकर यांनी शस्त्रे दाखविताना विद्यार्थ्यांच्या मदतीने नाट्यकरण घडवून आणले. व प्रत्यक्ष प्रसंग कसा घडला याचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच प्रत्येक शस्त्राबद्दल त्याच्या नावासकट गुणवैशिष्ट्ये ही अतिशय सुंदर भाषेत सांगितली. अफजल खान वध हा प्रसंग अतिशय रोमहर्षक रित्या समजावला. कु. गौरी संदीप सावंत व कु. शौर्य गणपत परीट या विद्यार्थ्यांनी जीरेटोप, ढाल व तलवार परिधान करून शिवरायांच्या जीवनचरित्रावर गोष्टी सांगितल्या.
या प्रदर्शनाचा लाभ पाट्ये पुनर्वसन शाळा तसेच सासोली नंबर एक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच ग्रामस्थ माजी विद्यार्थी पालक व इतिहास प्रेमींनी घेतला. यावेळी ऍड . सोनू गवस यांनी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना शिवरायांबद्दल माहिती सांगताना आजच्या युगात आईने मुलावर संस्कार कसे घडवावे याबद्दल सांगितले. पाट्ये शाळेच्या वतीने ज्ञानेश्वर राणे व बाबा चिपकर या दुर्ग प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक संस्थेच्या कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित कुमुदिनी दळवी मुख्याध्यापिका सासोली नंबर आनंद नाईक मुख्याध्यापक शाळा पाट्ये पूर्वसन, दयानंद नाईक, दत्तप्रसाद देसाई. हेमंत सावंत, संजय देसाई, दिलीप कळणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी नाईक, उपाध्यक्षा निधी गवस शिक्षणाप्रेमी कृष्णा दळवी, पोलीस पाटील श्रीराम गवस.भूषण सावंत,तसेच अनेक महिलांवर्ग, पालक व ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रम आयोजना साठी गणेश नाईक सर मठ शाळा वेंगुर्ला यांचे सहकार्य लाभले.










