नाधवडेत २८ फेब्रवारीला राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 16, 2026 14:02 PM
views 41  views

वैभववाडी : बंड्या मांजरेकर मित्र मंडळ, नाधवडे  यांच्या वतीने  भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत २८फेब्रुवारीला  आयोजित करण्यात आली आहे. नाधवडे येथील महादेव माळ मैदानावर ही स्पर्धा संपन्न होणार आहे.पालकमंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती असणारं आहे.

गेली चार वर्षे तालुक्यात नाधवडे येथे बंड्या मांजरेकर मित्र मंडळाच्यावतीने बैलगाडा शर्यतीच आयोजन करण्यात येते.याहीवर्षी शनिवारी २८फेब्रु.ला ही स्पर्धा होतं आहे.राज्यभरातील नामांकित बैलगाडा मालक व शर्यतपटू या स्पर्धेत सहभागी होणार असून, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत थरारक सामने रंगणार आहेत. शर्यतीचे उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजू शिंदे(७९७७५५६८२५),दया तानवडे(८७८८५४४५९४) यांच्याशी संपर्क साधावा.तसेच या भव्य शर्यतीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.