
सावंतवाडी : गेल्या ३ वर्ष पासून रखडलेली नाविन्यपूर्ण पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात कामाला सुरुवात झाली. पाणीपुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी या कामाचा आढावा घेतला. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन ते काम चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना बांदेकर यांनी केल्या. सावंतवाडी शहरासाठी ही योजना अत्यंत गरजेची असल्याने ही योजन लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.












