तेरवण मेढे नागनाथ मंदिरात शिवरात्रीचा उत्साह

असंख्य भाविक नागनाथ चरणी लीन
Edited by: लवू परब
Published on: February 15, 2026 18:48 PM
views 41  views

दोडामार्ग : पांडव कालीन श्री नागनाथ तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यात प्रसिद्ध असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील श्री नागनाथ मंदिरात शिवरात्री उत्सवा निमित्त रविवारी भक्तांचा जनसागर उसळला होता. विद्युत रोषणाईने संपूर्ण मंदिर सजविले होते. हरहर महादेव, ॐ नमो शिवाय च्या जायघोशात शिवरात्र उत्सव पार पडला. तेरवण मेढे श्री नागनाथ तीर्थक्षेत्रात शनिवार पासूनच भाविकांनी दर्शन घेण्यास सुरवात केली होती. यासाठी तालुक्यातील पोलीस प्रशासन व स्थानिक सल्लागार उपसमिती देवस्थान समिती भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होते. नवसाला पावणाऱ्या श्री नागनाथाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक नागनाथ तीर्थक्षेत्रात लीन झाले होते.

पहाटे ०४.०० वाजता मंदिर परिसरातील तळीत सर्व भाविकांनी स्नान करून अभिषेक करून श्री नागनाथ लिंगाचे दर्शन घेतले. ओल्या अंगावर तळी काठी बसून सर्वच भक्तांनी अभिषेक केले. त्याचं प्रमाणे हात, पाय, कान, नाक, डोळे, माणूस  असे आपल्या शरीराचे पंच धातूचे अवयव तिथल्या तळीत टाकून आपला नवस पूर्ण केला तर काहीनी नवस केला. अस म्हटलं जात की आपल्याला किणतीही इजा किंवा आपल्या शरीरातील अवयवाला आजार पण असेल तर ते आजारपण दूर करण्यासाठी त्या तळीत पंच धातूचे अवयव टाकून नवस पूर्ण केला जातो अशी ख्याती असलेल्या श्री नागनाथ तीर्थक्षेत्रात भक्तीचा जनसागर उसळला होता.

दरम्यान, भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रविवारी तेरवण मेढे येथील श्री नागनाथ तीर्थक्षेत्रात लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत दोडामार्ग भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक गवस, नगरध्यक्ष चेतन चव्हाण, रंगनाथ गवस, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, पराशर सावंत, राजेश फुलारी, देवस्थान समितीचे अध्यक्ष देऊ गवस, प्रेमानंद देसाई, शिरीष नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.