नारायण सावंत यांची किमान वेतन आयोगावर निवड

बबन साळगावकरांनी केलं अभिनंदन
Edited by:
Published on: February 12, 2026 15:30 PM
views 158  views

सावंतवाडी : उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयक म्हणून निवड झाली असून छ. उदयनराजे भोसले यांच्या विश्वासातील व भाजप पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गुरुकुल येथे पुष्पगुच्छ देऊन त्यांच अभिनंदन केलं व पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक आनंद नेवगी तसेच गुरुकुल व राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, अभय पंडित, मनोज घाटकर, उमेश खटावकर शिवम सावंत,अशोक पेडणेकर, मयूर लाखे, इप्तिकार राजगुरू, कादर गवंडी, धीरज गावडे व रवी जाधव उपस्थित होते.