
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी दिलिप उर्फ राजन गिरप हे सलग दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. तसेच भाजपचे १६ नगरसेवक निवडून येत जिल्ह्यात ऐतिहासिक कामगिरी केली. यनिमित्त माजी पालकमंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दिलिप गिरप यांचा आंगणेवाडी येथे श्री देवी भराडी यात्रोत्सव वेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी आंगणेवाडी मंडळाचे पदाधिकारी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, वेंगुर्ला नगरसेवक प्रशांत आपटे, अन्य पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी गिरप यांचा सन्मान करताना भाजपाने स्वतंत्र लढताना वेंगुर्ला नगरपरिषदेवर मिळविलेली एकतर्फी सत्ता निश्चितच उल्लेखनीय आहे. दिलिप गिरप यांनी जनतेने दुसऱ्यांदा दिलेल्या संधीचा उपयोग करून वेंगुर्ला नगरीच्या विकासासाठी आणखी भरीव योगदान द्यावे. आपले वेंगुर्ला शहर विकासासाठी कायम सहकार्य राहील, असे ना. चव्हाण यांनी बोलताना सांगितले.











