माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप परिसरात कोसळले झाड

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 06, 2026 15:07 PM
views 26  views

सावंतवाडी : माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप परिसरात जुन्या मुंबई–गोवा महामार्गावर आज दुपारी अचानक झाड कोसळून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. नागरिक, प्रवासी आणि वाहनचालक अक्षरशः अडकून पडले होते. मात्र अशा संकटाच्या क्षणी फक्त आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करणारे नेतृत्व म्हणून जिल्हा परिषदचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार दिनेश सावंत पुन्हा एकदा जनतेच्या मदतीला धावून आले. घटनेची माहिती मिळताच कोणताही विलंब न करता दिनेश सावंत यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजेरी लावली. स्वतः पुढाकार घेत कोसळलेले झाड तोडून बाजूला करण्याची व्यवस्था केली आणि काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.यावेळी सरपंच रिचर्ड डिमेलो, सन्या सावंत, राकेश नार्वेकर तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले.