देवगडमधील जि. प. च्या ३ जागांसाठी तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी उद्या मतदान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 06, 2026 16:28 PM
views 29  views

देवगड : देवगड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होत आहे, मतदानासाठी  प्रशासन सज्ज झाले असून  देवगड तहसीलदार कार्यालयातून मतदान पेट्या मतदान केंद्रांवर रवाना झाल्या आहेत,या निवडणुकीसाठी कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे उमेदवार सुनील पारकर आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार गणेश गावकर तर या पंचायत समिती गणातून शिवसेनेचे उमेदवार अमोल लोके आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार गणेश वाळके रिंगणात आहेत तर मुणगे पंचायत समिती गणातून भाजपचे उमेदवार सदाशिव ओगले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दीपक कदम यांच्यात लढत होणार आहे.किंजवडे पंचायत समिती गणातून भाजपच्या स्नेहा अणभवणे तर मनसे कडून निकिता दाभोळकर रिंगणात आहेत,शिरगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे देवदत्त कदम हे उमेदवार असून त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि  मनसे तसेच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. 

तळवडे पंचायत समिती गणात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सलोनी तळवडेकर तर काँग्रेस कडून मयुरी जाधव यांच्यात लढत होत आहे.पुरळ जिल्हापरिषद गटातून ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे  उमेदवार सूनील तेली आणि भाजपचे उमेदवार संजय बोंबडी यांच्यात लढत होत आहे. तिर्लोट पंचायत समिती गणातून  ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील तिर्लोटकर आणि भाजपचे रविंद्र तिर्लोटकर रिंगणात आहे. पुरळ पंचायत समिती गणातून भाजप उमेदवार संजना आळवे आणि ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सानवी तिर्लोटकर हे उमेदवार रिंगणात आहेत.

मणचे पंचायत समिती गणातून शिंदेंच्या शिवसेनेतून विलास साळसकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून विष्णू घडी यांच्यात लढत होत आहे. पोंभुर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे सादिक डोंगरकर तर ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे वेंकटेश नर यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.