पार्लमेंट टू पंचायत आमच्याकडे | विकासाची जबाबदारी माझी : नितेश राणे

माजगाव जि. प. मतदारसंघात महायुतीची प्रचार सभा
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 04, 2026 20:56 PM
views 20  views

सावंतवाडी : माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित होणार आहे. ही जागा बिनविरोध होणार होती. मात्र, आमच्या काही लोकांनी काड्या केल्या असा जोरदार टोला त्यांनी हाणला. तसेच उरलेले तिनं दिवस उबाठाच्या उमेदवाराला मानसन्मान द्या, विजय हा विक्रांत सावंत यांच्याच होणार आहे. रेश्मा सावंत यांनी 90 टक्के मॅच जिंकली असून केवळ बॅट उंचावायची शिल्लक आहे.  या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना साथ द्या, विकासाची सगळी जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी राहील. सोबत आम. दीपक केसरकर आहे.‌ त्यामुळे कसलही चिंता करू नका. पार्लमेंट टू पंचायत आमच्याकडे आहे. त्यामुळे पुढची 5 वर्ष सेवा करण्याची संधी द्या असं आवाहन केलं. दरम्यान, फक्त, ही निवडणूक होऊ देत. 9 तारखेनंतर बोलेनच. कारण, आमच्या जिभेला हाड नाही असा इशारा त्यांनी दिला. तसेच विक्रांत सावंत यांना आशीर्वाद द्या, भाऊ म्हणून त्यांच्या मागे मी उभा आहे अस आवाहन श्री. राणेंनी केलं. विरोधकांकडे सत्ता नाही, विकासनिधी देऊ शकत नाही. विकास करण्याची धमक आमच्यात आहे. त्यामुळे महायुतीला साथ द्या असं आवाहन त्यांनी केले.

माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर म्हणाले, महायुतीचा विजय निश्चित आहे. माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाला मोठा वारसा आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद या मतदारसंघान भुषवल‌ आहे. विक्रांत सावंत यांच्यासह दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज माजगावात आल्यानंतर स्व. विकास सावंत यांची आठवण आली. या मतदारसंघाच नेतृत्व अनेक दिग्गजांनी केलं असून विक्रांत सावंत यांच्या रुपाने एक युवा कार्यकर्ता या मतदारसंघाला लाभला आहे असं मत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केल.

यावेळी बोलताना उमेदवार विक्रांत सावंत म्हणाले, आमच्या तिनं पिढ्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.‌ त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याच काम मी करत आहे. मी राजकारणात पैसा कमावण्यासाठी, काळे धंदे करण्यासाठी आलो नाही. पारदर्शक काम काय असतो हे दाखवण्यासाठी मी निवडणूकीच्या मैदानात आहे. पैशान नव्हे तर प्रेमानं माणस जोडता आली याचा मला सार्थ अभिमान आहे. 

या सभेस पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आम. दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उमेदवार विक्रांत सावंत, रेश्मा सावंत, अशोक दळवी, सचिन बिर्जे, उत्कर्षा गांवकर आदी उपस्थित होते.