कोलगाव जि. प. त अज्ञात बाबाचा वावर

बाबामागे कोणाची आहे पाॅवर..?
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 04, 2026 14:04 PM
views 310  views

सावंतवाडी : कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात एका अज्ञात बाबाच्या वावरामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ही व्यक्ती ज्योतीषी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून येथील ग्रामस्थांनी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या बाबाला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती मिळत आहे.

या बाबाचा संशयास्पद वावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हा बाबा नेमका कोण  ? तो कोलगाव मतदारसंघात कुठून आणि कशासाठी दाखल झाला ? याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने विविध तर्कवितर्काना उधाण आले असून मतदारसंघात चर्चा रंगली आहे. दरम्यान, पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून. पुढील चौकशीनंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.