
दोडामार्ग : दोडामार्गमधील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये अपक्षांचीच सत्ता बसणार असा ठाम विश्वास माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी व्यक्त केला. मणेरी जिल्हा परिषद मतदार संघात कळणे गावाच्या सुनीता भिसे या निवडणूक लढवत आहेत. मणेरी मतदारसंघात प्रचार करत असताना आम्हाला मतदारातून असे सांगितले जाते की नाडकर्णी तुमचा उमेदवार आहे ना मग प्रचारासाठी फिरण्याची गरज नाही आम्ही सर्व मतदार तुमच्या पाठीशी आहे. भिसे यांना प्रचंड मतांनी विजयी करु असा विशाव मतदारांनी व्यक्त केला असल्याचे नाडकर्णी म्हणाले.










