स्वर्गीय भाईसाहेब सावंतांना जयंतीदिनी अभिवादन..!

आमदार दिपक केसरकर - विक्रांत सावंत यांची उपस्थिती
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 04, 2026 13:21 PM
views 26  views

सावंतवाडी : माजी आरोग्यमंत्री, लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती माजगाव येथील प्रेरणा समाधी स्थळी बुधवारी साजरी करण्यात आली. यावेळी माजी शिक्षणमंत्री, आमदार दिपक केसरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले. 

लोकनेते व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती निमित्त त्यांच्या माजगाव येथील प्रेरणा समाधी स्थळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आमदार दिपक केसरकर, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी सभापती अशोक दळवी, अमोल सावंत, प्रदीप सावंत, अजित सावंत, व्ही बी नाईक, चंद्रकांत नाईक, ॲड. दिलीप नार्वेकर, संजय कांनसे, रवींद्र म्हापसेकर, संदीप राणे, डॉ दिनेश नागवेकर, प्रसाद सावंत, म.ल. देसाई, राजू कुबल, सचिन बिर्जे, संजय लाड, अर्चित पोकळे, मेघश्याम काजरेकर, प्रा धीरेंद्र होळीकर, एस.पी.नाईक, प्रा. सतीश बागवे, आदी भाईसाहेब सावंत प्रेमी, नातेवाईक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.