
सावंतवाडी : कोलगाव येथे जिल्हा परिषद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी त्यांनी घरोघरी जात प्रचार केला. त्यांच्यासोबत शिवसेना पंचायत समिती उमेदवार प्रणाली टिळवे यांनीही प्रचारात सहभाग घेतला. यावेळी श्री. डिसोजा यांनी हुकुमशाही जनता निश्चितच धडा शिकवेल असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, विरोधकांकडून हुकुमशाही राजकारण केलं जात. पदाचा गैरवापर करून घेतला जातो असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच येत्या ९ तारखेला निश्चितच जनता आपल्याला आशीर्वाद देईल. शिवसेनेसह उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीचीही साथ अपक्ष म्हणून मला असल्याच्या दावा त्यांनी केला. यानंतर ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन पत्रक वाटप करत आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रणाली टिळवे, शिवदत्त घोगळे, तुकाराम कासार, पुनम उगवेकर, संदीप गवस, मेल्वीन डिसोजा, राजेंद्र निर्गुण, अशोक डामरेकर, विजय टिळवे, संतोष राऊळ, राकेश पवार, अजय सावंत आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










